सरडा ✍️
!! सरडा !!
किमया याची भारी
उष्ण कटीबंधात सारी
जमीन जल फिरी
प्रजाती सहा हजारी.
असतात पाय दोन
भक्ष पकडतो पटकन
उडी मारतो छान
फिरतो जंगल रान.
जातो तिकडं हा
रंग बदलून घेतो
साधर्म तोच साधतो
किटकांना तो फसवतो.
बेसावध कीटक लक्ष
माणसातही वृत्ती याची
बहुरंगी असतात काही
आठवण येते त्याची.
रंग बदलू प्राणी
दिसता गुलाबी करडे
अंगावर असता खवले
इवलें जीव सरडे. ©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


सध्या परिस्थितीत अशी माणसे समाजात आढळतात सरड्याचे वर्णन खूप छान काव्यातून छान वर्णिलेले आहे
ReplyDeleteछानच
ReplyDelete