दृष्ट शक्ति ✍️
!! दृष्ट शक्ति !!
दृष्ट असते शक्ति
मारते तिला भक्ती
देऊ त्यासी मुक्ती
साधु छान युक्ती.
सर्प घालतो अंडी
निघता त्यातुन पिलं
गिळतो दिसेल ते
सर्व मारतो मुलं.
सुटते नजरेतून त्याच्या
तीच जगतात दुनियेत
तीच तऱ्हा विंचूवाची
थोडी वेगळी नजरेत.
मादी देते पिलू
जन्मता खातो आईला
मारून येता भुईला
विष नांगी सुईला.
असतात अश्या शक्ति
स्वतः मारता स्वतःला
नको त्यांच देणंघेणं
लांब ठेवु या शक्तीला.
चांगले मारूशक्तत नाही
म्हणून संपवता स्व जातीला
आपण राहु बाजूला
जोपासु छान संगतीला.
ईतर प्राणी मदतीला
काही गुण दृष्ट माणसाला
मुकता ते स्वजतीला
गाडू या शक्तीला.
सद्विचार अंगीकरू चला
वरती उदाहरण मुला
लागु चांगल्या संगतीला
देव देईल झुला.©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment