हत्ती ✍️

                          


                           !!    हत्ती    !!


एकत्र कुटुंब पद्धती 

कळप सोबत राहत 

वास्तव्य असतं रानात 

काळजी एकमेकांची घेत.


मुंगी गेली कानात 

म्हणतात कासावीस जीवात 

जीव असतो प्रमुखात 

देतात सर्व साथ.


अस्तित्व आहे त्यांचं 

मोल असतं शेणाचं 

खत होतं रानाचं 

जगणं ते प्रेमाचं.


शरीर जरी धिंप्पाड 

नर मांदिचं पाड 

सुपा एवढे कान

खातो कधी काड.


मान हत्तीवरच्या अंबारीचा 

पाळीव राजे महाराज्यांचा 

जीव खुप मोलाचा 

संन्मान याच्या चालीचा.


विचार स्व जातीचा 

कुटुंब कळपात राहण्याचा 

मृत पावला सोबती 

 पाळतो काळ दुःखाचा.


हत्ती बाळगतं लष्करी 

अवजड तोफा धरी 

जीव आहे कष्टकरी 

प्राणी धिंप्पाड जरी. ©️ ®️ @  लागु.


प्रदीप मनोहर पाटील 

मु. पोस्ट गणपूर ता चोपडा 

जिल्हा. जळगाव.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे