स्त्री पुरुष शिल्पकार ✍️

 ही 'प्रदीप मनोहर पाटील' यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही जीवनातील महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन 'शिल्पकार' म्हणून केले आहे.

​येथे ती कविता पूर्णपणे दिली आहे:


​"स्त्री एक शिल्पकार"


​बीज अंकुरण पोटात

गोळा आकार उदरात

बाळ रांगती घरात

पोषण त्यास छातीत....

​बोल शिकवी त्यास

मग भरवी घास 

मग देतं  आधार

सोडी प्रथम शाळेत.

​संस्कार माया मनाला

सोसून चटके हातास

भरवते रोज कुटुंबास

नवअलंकार देते त्यास....

​निर्मितीकार शिल्पकार जननी

उपमा अपूर्ण देवास

जीव करते साकार

वंदन करतो तीस....

"पुरुष एक शिल्पकार"


​बीज उत्कृष्ट पेरली

फुलवली सारी धरणी

मातीत पाया भरणी

नवनिर्मिती जीवन सत्कारणी ..

​राब राब राबतो

शूरता वीरता गाजवतो

कुटुंब पुढे चालवण्या 

पृथ्वी पायी फिरतो...

​कर्तव्य तोच गाजवतो

कधी रणांगणात मरतो

वैभव तोच निर्मिती

कर्ता करविता तो....

​उत्पत्तीकार असतो तोच

स्वप्न करतो साकार

हक्का कड्या लढवण्या

पेलून खांद्यावर भार...

​त्यालाच सारा भार

संघर्षातून उद्धार

सोसून अंगावर वार

पुरुष देव निर्मितीकार...

​हाच खरा शिल्पकार

सृष्टी रचिता वाढविला

ब्रह्मांडी ज्योत जागविला

त्रिलोकी झेंडा रोविला....



"​स्त्री पुरुष शिल्पकार"


​एक आहे माती

दुसरा असतो बीज

एक अंगाच्या बाजू

मिळून चमकविता  वीज...

​सारी धरणी अवतरली

या दोघांची करणी

माया वेडी मस्तानी

बाप घेतो सावरूनी...

​दाता बस विधाता

माता मय ममता

मिळून मिसळून समता

एकत्र मोट बांधली...

​नराचा होतो नारायण

नारी वाटते परायण

युद्ध हस्ताने महाभारत

मिळून घडलं रामायण...

​विश्वची निर्मिती नरनारी

जगात आहे भारी

त्रिभुवनी पाऊले तरी

एकत्रित कुटुंब उभारी...

​शिल्पकार दोन्ही आहेत

सोबत चित्र सुंदर

वावर असतो एकत्र

अधिराज्य सृष्टीवर सुंदर....

​- प्रदीप मनोहर पाटील

गणपूर जिल्हा. जळगाव.

मो. ९९२२२३९०५५

​ही कविता स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर पूरकता आणि त्यांच्या कष्टांचा सन्मान करणारी आहे. तुम्हाला या कवितेचा भावार्थ जाणून घ्यायचा आहे का? 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे