क्षण माझे ✍️

 क्षण माझे 


क्षण माझे सुंदर होते एकटीचे 

आला तु जीवनात सोबत देण्या 


दाखवतं स्वप्न स्वर्ग सुखाचे सारे 

भुलली गोड सुटलेत मनात वारे 


विसरून भान करतं जीवन रान 

सर्वस्व अर्पण होऊन मी देहभान 


वाटलं या क्षणात होऊ रममान 

गात होता तुही एकीत गुणगाण


 घट्ट धागा हा तोडलास तुही तेव्हा 

राजी खुशीत मिठीत होते मीही 


आनंद आनंदी जीवन येईल वाटलं 

विरल्या भावना थंड पडलं तुझं मन 


लुटून क्षण क्षणात तु विसरलास सख्या 

भावना केल्यास तु माझ्याच मुक्या 


तोडून धागा भंग केलंस स्वप्न 

दुःखी वाटतं का केलंस अर्पण.©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

पिन. 425108

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे