तुझ्या वीण राहवत नाही ✍️

 तुझ्या वीण राहवत नाही 


समजून घेना राहवत नाही आता

कधी जवळ येशील मिठीत हो भ्राता! दृ!


छाती धडधडते आठवणीत तुझ्या 

कधी रे कवेत घेशील रे सोन्या राज्या 

एक वेळ माझ्याकडे येऊन पहाणा 

तुझ्या शिवाय जीव कासावीस झालाना!1!


लहान पणी खेळायचो झिम्मा अन फुगडी 

तु झालाय रांगडा पहिलवान गडी 

ये ना फेड राज्या आता साडी अन चोळी 

तुझ्या साठी मोडली नाही कोणा कडून घडी.!2


नुसतंच बघायचं दिवस गेलं आता 

मिठीत घे जवळ येऊन तुच स्वतः 

भोगून मी भ्रम्हाचारी राहिली 

तुझ्या मिठीत मी जिंदगी जपून ठेवली 3


पहिलं प्रेम अन नदीवर चा गेम 

तुझं नं माझं वाटतं सारं सेम 

झुरण्यात चालली वाया पराग चाखण्या पडली कोरडी काया 

क्षण भोगून घेऊ दुर नको जाऊ सदैव सोबत राहु !4©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे