पृथ्वी स्त्री मादी माता ✍️
पृथ्वी स्त्री मादी माता.
नर नारी मनुष्य जन्माला स्त्री आणि पुरुष दोघांच्या सहयोगातून जन्माला येणारं फळ. तसंच फळ जिवश्रुष्टि मधील सर्व चल अचल जीव यांचं पण तसंच असतं. अपत्य जन्माला येणं म्हणजे. पंचतत्व सहयोग जुळून नर मादी यांच्या घर्षणातून येणारी नवं निर्मिती. श्रुष्टी तील सारी श्रुष्टी आपल्या जीवाची वाढ करणं हेच ध्येय ठेवतं असते. जीव कोणताही असो मग. चल जीव काही नर मादी संभोग क्रिया करून बीज अंकुरण करतं असते. तर काही जीव स्पर्श किंवा ईतर काही मार्गानं आपल्यातील असलेलं नर हा बीज स्त्री मध्ये विलीन करतं असतो. मनुष्य जसं कामक्रीडा करून आपली मनुष्य प्रजाती वाढ करते अगदी तशीच उत्पती साऱ्याचं जीवांची असते असंच माझं मत. नर मादी ह्या एकाच अंगाच्या दोन बाजु. चल प्राणी पशु पक्षी यांच्यात आपण नर मादी ओळखू शकतो. पण अचल जीव श्रुष्टीत वृक्ष किंवा अचल सारी आपलं आपलं फळ बीज निर्माण करतं असतं अन निर्मितीसं देतं असतं. फुलं जसं नर मादी परागकण. चल जीवांच्या उडणाऱ्या जीवांच्या माध्यमातून आपलं बीज स्त्री वर्गात टाकत असतो अगदी तसंच अचल जीव सुद्धा नर मादी सहयोग पण कसा तर अगदी तसाच जसा फुलांचं फलन पराग कण फुलपाखरू भुंगा माशी इकडून तिकडे फिरताना करते तसंच फलन वृक्ष सुद्धा करतं असतात. हवा, किंवा ईतर पशु, पक्षी यांच्या येण्याजान्याणे नर मादी सहयोग घडून आणलं जातं असंच जीव जीवन नवं प्रणाली असते साऱ्या जीवांची. एक अंगाच्या दोन बाजु पण वेगवेगळ्या असतात होतात. परत एकरूप होता अन नवं निर्मिती करतात असंच आहे. अचल जीव जीवन श्रुष्टी मध्ये. गहू, हरभरा, मका, टमाटा, गाजर, भुईमूग,इत्यादी वाण तर सारखीच किंवा वृक्ष निंब, चिंच, आंबा, पेरू, नारळ,ई. हे वृक्ष वृक्ष प्रजाती जाती सारखीच पण त्यांच्यात सुद्धा नर मादी सारखं फलन प्रक्रिया झाल्या शिवाय नवं निर्मिती होणं शक्य नाही. नराचं बीज तयार होतं त्यातून फळ तयार होतं खाली पडून पुन्हा नवं निर्मिती मातीत होते.अचल चल सृष्टी यात परागकण क्रिया सहयोग यातून तर अचल श्रुष्टी यात. बीज पंचतत्व घटक माती पृथ्वी यातून बीज वर येतं असते. अचल बीज पृथ्वी पोटातून वर येते तर चल बीज एकातून दुसरी वातावरणात निर्मिती पृथ्वी च्या वरती होते. एकातून दुसरं बीज उत्पादन सहयोगिनी च्या सहयुगी करणातुन नवं उत्पादन उत्पन्न नर मादी. मी आपणास ठाम पणे सांगतो अचल काही बीज पृथ्वी वर मातीतुन येतं अगदी पंचतत्व घटक साऱ्यातून सुद्धा येतं अन येतं असलं पाहिजे असंच माझं प्रदिपचे मत आहे. माती, हवा, पाणी, आणि आग, घर्षण हि प्रक्रिया मी मानतो एकातून दुसऱ्यात जाणं हि प्रक्रिया म्हणजे घर्षण. म्हणजेच पृथ्वी अन पृथ्वी वरील सारी वातावरण वलंय हेच सारं जीव जीवन श्रुष्टी मधील महत्वाचं अंग नव्हे पृथ्वी हिच माता आहे साऱ्या जीवांची तीच एक स्त्री बीज आहे. पृथ्वी माता म्हणूनच म्हटलं गेलंय. सारेच जीव जीवन श्रुष्टी निर्मिती पृथ्वी हिच आहे. या भ्रम्हाडात हि पृथ्वी माता आहे तर दुसऱ्या सौर मालेतील दुसरी पृथ्वी हि दुसरी माता जीवन श्रुष्टी मधील. अगदी तसंच ईतर सौर मालेत सुद्धा जीव जीवन आहे असंच माझं मत जीव जीवन फक्त अन फक्त पृथ्वी वर असलं पाहिजे असंच त्यात माझं मत. ईतर ग्रह हे नर ग्रह ते फक्त जीव जीवन निर्मिती प्रक्रिया करतात फक्त. मादी पृथ्वी जीवांची वाढ संगोपन करते असंच.टेबल वरील मासे तलाव हा जसा असतो अगदी तसंच पृथ्वी वरील सारं वातावरण यात जीव जीवन फिरतं असतं असंच आहे. या सौर मालेत जशी चल असो वा अचल असो जीव जीवन निर्मिती प्रक्रिया आहे तशीच ईतर पृथ्वी ग्रहवर सुद्धा असलीच पाहिजे पण जीव जीवन पद्धत अन या पृथ्वी पेक्षा वेगळे जीव जीवन आकार असलेले जीव जीवन. जे या पृथ्वी वरील मानवाच्या आकलणाच्या पलीकडे असु शकतं. जसं इथलं मानव तेथे सुद्धा भिन्न आकारमान असलेला प्राणी असु शकतो. असो माझं म्हणणं असं आहे की पृथ्वी हिच स्त्री आहे.आणि ईतर ग्रह सारे नर. पूर्वी कथेत सांगितलं लिहलं जायचं सूर्य पुत्र, शनी पुत्र, गुरु पुत्र, याचा अर्थ त्या ग्रहाच्या बिजातून आलेली उत्पती. म्हणजे त्या ग्रहाच्या घर्षण क्रियेतून उत्पती. प्रेत्येक ग्रहाची एक वेगळी शक्ति असते.त्या शक्ति तुन पृथ्वीवर होणारा परिणाम अन त्यातून निर्माण होणारं दुसरं रूप ती जीव उत्पती म्हणजे जीव जीवन हे भ्रम्हांड वरील साऱ्या ग्रहाँच्या फिरण्या मुळे अन त्यांच्या गुरुत्व शक्ति मुळे येणारं स्थित्यंतर मुळे नवं निर्मिती निर्माण जीव स्वरूपात येतात अवस्था वेग वेगळी असली तरी पेशी सुष्म निर्गुण निराकार तें सुष्म शुक्राणू पासून तें शरीर पर्यंत पृथ्वी वर सौर मालेतील ग्रहान्चा प्रभाव पडतं असतो.म्हणजेच त्यांच्या मुळे नाही पण जीव उत्पती मध्ये महत्वाचं अंग तें पंचतत्व सोबत ग्रह गुरुत्वाकर्षण शक्ति मुळे त्यांच्या प्रभाव मुळे जीव निर्माण निर्मिती होते. याचा अर्थ पंचतत्व सोबत गुरुत्व आकर्षण ग्रहाची शक्ति हि सुद्धा पृथ्वी वर जीव निर्मिती प्रक्रिया मधील महत्वाचे घटक आहे. सौर मालेतील भ्रमण करतांना निर्माण होणारी ऊर्जा तिच्यातुन येणारी शक्ति जीव निर्मिती किंवा जीव भ्रमण प्रक्रिया यावर प्रभाव टाकते म्हणजेच माझं असंच प्रदीपचे मत आहे. पृथ्वी हि माता आहे तर ईतर ग्रह हे पिता आहेत हेच यातून माझ्या मतां प्रमाणे सिद्ध होते.
©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment