विरह क्षण ✍️

 विरह क्षण 

क्षण आपले सुखाचे आठवत आता 

जीवन जगणे एकटं त्रासदायक आहे 


दुनिया सभोवती सर्व दिसतेय 

तरी एकटं एकटं वाटतं आहे 


चित्त सैरभैर चोहीकडे फिरतंय 

तुझाच चेहरा गर्दीत भासतं आहे 


कोरडे शुष्क ओठ पडलेय आता 

ओलावा ओठावर लागणार आहे 


एकरूप जीव आपुले आठवत 

शरीर वेगळं असंहय वाटतं आहे 


जरी दुर आहोत आपण तरीही 

मन स्वास स्वासात गुंतलेलं आहे 


नको लावु विलंब येण्यास आता 

 पुन्हा नव्याने एकरूप होणार आहे 



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे