पुरुष लावणी ✍️
पुरुष लावणी :- महंती पुरुषाची
रांगडा तरुण देखणा तुम्ही लई
नजरेनंच घायाळ झाली गं बाई !दृ!
चिकणा चिकणा मर्द तरुण ताठा
तुम्हा बघताच उठतात तरंग लाठा
किती हो सुंदर तुमचा फेटा
तरुण सागर वाटे अथांग मोठा.!1!
गुलाबी गुलाबी तुमचे ओठ
मिठीत येतील सतरा साठ
पण तुम्ही भरा ना माझाचं माठ
लहान पण पासून बघते मी वाट!1!
जसा चमचम चमकती काजवा
अंधारात रान तुम्हीच सजवा
जपून ठेवेन आयष्यभर तो ठेवा
अहो दयाल ना तुमी रान मेवा!2!
तुमचा प्रकाश रोजच हवा
लावा ना वंश वाढीचा दिवा
मुठीत नको मिठीत मला हो ठेवा
मिळून खाऊ गोड एकीत खवा!3!
©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment