नर नारी अवस्था एकच ✍️
नर नारी अवस्था एकच
अचल जीवात नर नारी किंवा दोघं एकत्र अवस्था हि एकच असते. अचल बीज हे एकातून दुसरं निघतं. किंवा एकातून हजारो लाखो अनंत निघतात. एका दाण्याचे हजार दाणे असंच. गाजर, मुळा, सारखी ज्यांना आपण कंद मुळं म्हणतो ते बिजातून दुसरं बीज निर्मिती नींर्मितो एकातून दुसरं त्यांच बिजात अंनत बीज धारण करतं मुळा किंवा गाजर, रताडी हे मातीत वाढ करतात. शरीर उंच पृथ्वीवर येतं. बीज आत वाढतं. बटाटा, आद्रक,सारखी पण मातीत बीज उत्त्पती करतात. स्व शरीर वरती पृथ्वी तळावर वाढ करतात. म्हणजे पृथ्वी पोटात काही अचल चल जीव आपली वाढ करतात. अन पृथ्वीवर शरीर वाढवतात असंच. तेच ईतर चल अचल जीवात मका किंवा तत्सम काही अचल जीव आपल्या पोटातून बीज एकातून अंनत करतं असतात. मका सारखी काही झाडं आपल्या पोटातून बीज पिशवी कणसं बाहेर फेकत असतात. तर ज्वारी बाजरी सारखी झाडं आपली बीज शरीराच्या वरती डोक्यावर साठवत असतात. आपली बीज वाढ करतं असतात. वृक्ष आपल्याच शरीतून शरीरावर बीज वाढ करतं असतात. ज्याला आपण फळ नाव दिलं. पानं, फुलं, फळ, ह्या सुद्धा बीज पिशव्याच आहेत. त्या जिवाच्या उत्पतीच्या. एक तुन दुसरं किंवा एकातून अंनत वाढ. आपल्या जीवाची प्रत्येक जीव करतं असतो. म्हणजेच जो तो कुठून पण असेना आपल्या शरीरात वाढ करतं असतो अन दुसरी निर्मिती करतं असतो. हेच सूत्र सर्वीकडे आहे. मिळालेलं शरीर त्यातून दुसरी निर्मिती करणं. जुनं जीर्ण झालं तर आहे ते सोडणं अन दुसऱ्यात नवं अवतरणे अशीच अंनत जीव निर्माण निर्मिती प्रक्रिया. पानगळ सारखं आहे ते जुनं फेकणे दुसरं निर्माण करणं. केळी किंवा तत्सम काही एकाच बिजाच्या आता अनंत बीज एकातून दुसरं मातीत वाढवत असतात. एक बीज पिशवी ज्याला आपण खोड म्हणतो. एक खोड पृथ्वीतुन पृथ्वीवर शरीर वाढलं त्यानं बीज निर्मिती केली पूर्ण अवस्था झाली शरीर जीर्ण झालं ते सोडुन देतं अन खालून दुसरं निर्मित असतं.ज्याला आपण खोडवा म्हणतो. एकातून दुसरं तिसरं असं अंनत वाढ हि जीव प्रक्रिया अविरत सुरु असणारी प्रक्रिया पृथ्वीवर सुरूच असते. पृथ्वी हिचं जीव निर्मिती प्रक्रियेतील एक भाग आहे. जुनं सोडणं ते आहे त्या स्थिती तुन वाढतं वाढतं जातं एक अवस्था पूर्ण झाली दुसऱ्या अवस्थेत जातं असते अन त्यातून आपलं अस्तित्व दुसऱ्या अवस्थेत टाकून वाढ करतं असते अशीच प्रक्रिया. अचल जीवात नर, मादी किंवा एकरूप नरमादी हि एकजीव अवस्था असते. तर चल जीवात तीच अवस्था काही नव्हे अंनत जीवात भिन्न असते. आपण ज्याला बीज म्हणतो ते म्हणजेच त्या अचल जीवाचा गर्भ, गर्भपिशवी म्हणु आपण. होय ती गर्भ पिशवीच असते. त्यात बीज उत्पादन प्रक्रिया सुष्म जीव अंश वाढ करण्याची प्रक्रिया अंनत पेशीतून सुरु असते प्रत्येक जीवाची. जसं मानव किंवा ईतर पशु पक्षी यांचं बीज म्हणजे शुक्राणू म्हणतो आपण ती नवं उत्पती ची दुसरी अवस्था पण आपण सायन्स नें माझ्या मतानुसार जीव निर्माण निर्मिती प्रक्रिया ची शुक्राणू हि दुसरी अवस्था असंच आहे. पहिली अवस्था हि त्याहून सुष्म जी मानवी डोळ्यांना न दिसणारी. निर्गुण निराकार हि पहिली अवस्था. ज्या प्राण्याच्या जिवाच्या शरीरात वाढ झाली त्या जीवाची ती निर्गुण निराकार नंन्तर जी अमिबा सारखी मानवी डोळ्यांना नं दिसणारी हि पहिली अवस्था असते चल अचल जीव कोणताही असो. चल जीवाचं जीव निर्मिती विश्लेषण करतांना यातील काही गोष्टी सांगेन माझ्या आकलन शक्ति नुसार असो.आज अचल जीव निर्मिती प्रक्रिया वर लिहतोय तर त्यातील मला अल्प श्या बुद्धिमत्ता तुन सांगतोय. बाकी काही लोकांना अगाध बुद्धिमत्ता वाटेल पण आहे ती प्रत्येक जवळ अल्प असते. अगाध ज्ञान साठलंय अथांग सागरात त्यातील एक लोटा म्हणजे एक जीवाचं डोकं म्हणजेच अल्पचं ना असो.
अचल जीव हे आपलं अस्तित्व जीव वाढ हि कुठून पण सुरु करतं असतो. उदा. वरती काही दिलेत मी पण अजून काही मला अन आपल्या सर्वांना समजावे म्हणून सांगतो लिहतो. पानफुटी हे रोपटं ज्याला आपण पांनफुटी म्हणतो त्या छोटया जीवाची बीज अवस्था म्हणजे पान.पृथ्वीवर शरीर वाढ करतं असतांना. आपलं बीज नवं निर्मिती प्रक्रिया हि जमिनीला स्वतःच्या रोपट्याचं पान जमिनीवर पडलं किंवा टेकवलं तर त्यातून नवीन निर्मिती होतं असते. वरती लिहल्या प्रमाणे पान, फुलं, फळ, किंवा शरीरातील कुठलंही अंग त्यातून नवं निर्मिती होतं असते असंच आहे. जसं पायातून, बोटातून, पोटातून, पाठीतून, मान डोकं सारखं अचल जीव त्याच्या कुठल्याही अंगातून आपलं बीज नवं निर्माण साठी वाढवत असतो. पान, फुलं, फळ शरीरातील कुठलंही अंग हे त्या जीवाचा गर्भ. त्या जिवाने कोणत्या अंगातून नवं निर्मिती प्रक्रिया अवलंब केला तेथे त्याचा गर्भ तयार त्या गर्भात निर्गुण निराकार अवस्था मधून दुसऱ्या अवस्थेत त्या वृक्ष, रोप, किंवा कोणताही अचल जीव हा आपल्या तील अंश दुसऱ्या अवस्थेत निर्माण करतं आपलं बिजांड टाकतं गर्भतून नवं निर्मिती करतं असतो. अचल जीवात बीज अंकुरण बीज उत्पन्न उत्पादन हि प्रक्रिया काही जीवात चल जीव,किट किटाणू, पशु, पक्षी आपल्या आपल्या खाद्यातून बीज प्रक्रिया पार पाडत असतो. उदा. काही अचल जीव चल जीव अन्न म्हणून खात असतो. खाल्लेलं अन्न शरीरातून फिरून पशु, पक्षी, प्राणी आपली विष्टा मधून बाहेर टाकतं असतो. त्या विष्टेतून काही बीज इकडे तिकडे रुजण्यासाठी जातं असतं. नवं निर्मिती इकडून तिकडे चल जीव हे काही ठिकाणी करतं असतो त्या गोष्टी आपणास न्यात आहेतच. याच प्रमाणे हवा, पाणी, सुद्धा अचल जीव निर्मिती प्रक्रियेत एक दुसऱ्याला वाढण्या मदत करतं असतो. ज्याचं त्याचं शरीर गुणधर्म नुसार ज्याचं त्याची बीज प्रक्रिया वाढ होतं असते. असं कधीच घडतं नाही कावळ्याने किंवा चिमणीने ऊब्राचे पिंपळाचे फळ खाल्लं अन कुठं विष्ठा टाकली तेथे उंब्राचा फळ खाल्लं असेल तर त्याच्या टाकलेल्या विष्टेतून उब्राचंचं वृक्ष रोप निघेल. पिंपळ वृक्ष बीज खाल्लं असेल तर त्यांच वृक्षारोपण होतं तेच बीज उगवेल. दुसरं कधीच उगवणार नाही. म्हणजेच बीज अवस्था हि आपलं निर्गुण निराकार नंन्तर ज्या जिवाच्या बीज अवस्थेत गेली त्यांच अवस्थेत नवं निर्मिती करते हेच सत्य आहे. क्रॉस करण्याचा कितीही प्रयत्न केला तर अल्प क्रॉसिंग होते मुळं जीव अवस्था सोडतच नाही त्याचं जीवाची नवं निर्मिती करतं असते हेच यातून दिसतं. याचा अर्थ एक या जीवाचं घेतलं एक त्या जीवाचं बीज घेतलं तर नवीन अस्तित्वात येतं नसतं एकच कुठलं तरी नवं येईल. क्रॉस होणारच नाही. क्रॉस होईल तर काय होतं त्यांच बिजचं त्याचं वनशातील बीज नव्या रूपात येऊ शकतं नवीन जातीत नाही. आंबा बीज क्रॉस आंबाच होईल चिकू नाही असंच. उंबर चं उंबर पिंपळ चे पिंपळच क्रॉस होईल एकमेकात नाही चालणार चालतं असंच आहे. चल जीवांचं सुद्धा. मी प्रदीप आपणास नर नारी हि एकच अवस्था आहे असं सांगतं होतो ती आपल्याला आता पर्यंत अचल जीव जीवनात एकच अवस्था भिन्न अवस्था नाही असंच वाटतं. भिन्न जरी झाली असली तरी एकरूप झाल्याशिवाय नवं निर्मिती पंचतत्व घटक त्यात सामील झाल्या शिवाय नाही. अन त्यांच बीज अंश मधून तोच नवं जीव बीज अंश होतो हेच अंतिम सत्य आहे. नर नारी हे अचल जीवात बहुतेक अंनत जीवात एकरूप आहेत. एकातून दुसरं निर्माण करतं असतात. अगदी तसंच चल जीवात आहे. नर मादी एकजीव एकच आहेत किंवा एकजीव झाल्याशिवाय दुसरी नवं निर्माण निर्मिती होतं नाही चल जीवांची अवस्था चल नर मादी अवस्था यात आपण समजून घेऊ. हे तूर्तास येथेच थांबतो. नंन्तर कधीतरी यावर सुद्धा अजून लिहिणंच.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मो. 9922239055

Comments
Post a Comment