चल गं ✍️
चल गं
चल गं राणी जाऊ जरा दुर
खेळ खेळू मैदानी भरपूर!दृ!
तुला आवडेल तो खेळ खेळू
मस्त घाम आपला गाळू
संग कोणी नसले तरी
सर्व खेळांचा आनंद मिळवु.
कबड्डी कुस्ती मनसोक्त मस्ती
खेळाची नको धरू धास्ती
मोकळा मैदानी खेळ खेळू
खो खो करतं धावपट्टी मोडु.
नको सीमा रेषा ठेवु एकत्र होऊ
धाव धाव धावू कधी पुढे कधी मागे राहु
खेळाचा आनंद पहिल्यांदा घेऊ
चिंब घामेजून दोघं हि जाऊ.
बॅट माझी तुझ्या हातात
बॉल तुझा माझ्या बोटात
सारी धावपट्टी फिरतं राहु
क्रिकेट टीम खेळून बनवून घेऊ.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment