कवय ईशी रे देवबा ✍️
कवय ईशी रे देवबा
कवय ईशी रे देवबा
यंदा गयरा खाई रायना भाव.
भर ऊन मा फोडात माटीना ढेकाया
आशा तुनी व्हती ईशी तु पावसाया
जरी सुकायनी मनी काया
कोठे गई तुनी आते आमना वर नी माया.
कुणबी ना जनम मा कवय तरी दे सुख ना कन
व्यापारी पुढारी लुटिसन कामावतंस धन
तु तें कर ना आते मोठं मन
पिकाडू तं दे माले मग करतीन बठ्ठा माले निर्धन.
मरानं तें शेच मना नशीब मा
पण कस्ट करिसन मरना असं म्हणतीन ठेवानी वाट मा
लोकेसले जाऊ दे ना घास पोट मा
जरी काटा टाकतंस त्या मना वाट मा.
यंदा कोंल्लं काये वावर देखी
मन व्हयी रायनं दुःखी
जग मा खावाले भेटाव नहीं
माय लेकरूले ताराव नहीं नको अशी पाई.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता.चोपडा
जिल्हा.जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment