सख्या रे घायाळ मी ✍️

 सख्या रे घायाळ मी 


सख्या रे घायाळ मी तरणी 

तुझ्या साठी आलीय दुरुनी! दृ!


नजरेनं तुझ्या सोडला बाण 

त्यानं झालीय हो हैराण 

काळजात बसलाय बाण 

होते आठवणीत मी हो रममाण!1!


अहो केला तुमच्या साठी साज 

राहूद्या आपलं आपल्यात प्रेमाचं राज 

तुम्हीच उतरवा माझा शुंगार साज 

उतरवा तरुण पणाचा हो माज.!2!


जीवाला लागली तुमची हुरहूर 

जरी राहिलीय मी खूप दुर 

बघताच तुम्ही उडवला डावा डोळा 

तेव्हाच उठला पोटात गोळा!3!


वय आपलं आता लागलं सोळा 

अंगात उठताय प्रेम कळा 

रंगूया आपला प्रेम सोहळा 

कर ना अंग माझं चोळामोळा.!4!©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे