वंदन ज्ञानेश्वर माऊलींना. ✍️
वंदन ज्ञानेश्वर माऊलींना
वंदन करतो ! मनाने तुम्हाला!
दिलीत आम्हाला! ज्ञानेश्वरी !!
ज्ञानी्यांचा राजा! संत ज्ञानेश्वर!
दिला त्यांना वर! देवां नेच!!
रेड्या मुखी वेद! दिला सर्व छेद!
नसे भेदा भेद! जीवनात!!
शांत असे मन! भाऊ राही छान!
देवाला नमन! नित्य नेम!!
सदैव सर्वदा ! विठ्ठल नामात!
असले कामात! भाऊ जरी !
वाळीतले घर! पसरे पदर!
करतं गदर ! विठ्ठल विठ्ठल!
ज्यांनी दिला त्रास! त्यांना झाला भास!
सांगे यात वास! पांडुरंग!!
फिरे दारो दारी!मागे माधुकरी!
टाकली भाकरी! पाठीवरी!!
सिद्धी प्रात होती! जपलीत नाती
सांगे सर्वा नीती! जीवनात!!
प्रदीप लिहतो! अभंग रचना!
वेचूनी हो कणा! ज्ञानी्यांचा !!
प्रदीप पाटील
गणपूर. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment