गुरु ✍️
!! गुरु !!
ज्ञान मनात डोक्यात भरण्यास मदत करत भावनेत रुजवतो सद्विचार सदाचार शिकवण देत असतो आणि जीवन मार्गदर्शन करतं मूल्यवर्धक शिक्षण देत जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं असतो तो गुरु. गुरु हा मनुष्य जीवनात मृत्यू पर्यंत प्रवास जीवन जगण्याचा कसा करायचा काही अंशी दिशा दर्शक असाच असतो. गुरु यांनी जे पेरलं ते उगवतं पण कधी कधी गुरु सांगतात एक अन विध्यार्थी त्या शब्दाचे आकलन करतात दुसरच. जसं एकाच वर्गात अनेक विध्यार्थी असतात पण प्रत्येक विध्यार्थी याची आकलन शक्ति वेगवेगळ्या असतात. विध्यार्थी आपल्या आपल्या आकलन शक्ति प्रमाणे ज्ञान ग्रहण करतं असतो. नाहीतर सर्वच हुशार राहिली असती पण तसं कधीच कुठंच घडतं नसतं. उदा म्हणून सांगतो महाभारतात गुरु द्रोणाचार्य यांच्या कडे कौरव होते तसंच पांडव पण होते. अर्जुन होता तसं दुर्योधन सुद्धा होता. पण दोघं शिक्षण करतं असतांना दोघांची विचार सरणी वेगवेगळ्या होत्या राहिल्यात. तसंच तिसरा विद्यार्थी एकलव्य हा त्यांच्या आश्रमात नव्हता पण नुसतं गुरु मानून या दोघांच्या पेक्षा हुशार होता.बघा फरक न शिक्षण घेता सुद्धा नुसतं गुरु मानून सुद्धा एखाद्या विषया मध्ये प्रविण होणं हि जगातील सर्वात मोठी कला एकलव्य याने अंगिकारली.न शिक्षण घेता नुसतं मन मनात मनन करतं धनुरविद्या शिक्षण गुरु नसतांना सुद्धा मिळवणे म्हणजे एकाग्र ग्रहण शक्ति अर्जुन पेक्षा अफाट होती असंच मानावं लागेल. यावरून माझ्या मतां नुसार गुरु जीवनात मार्गदर्शन करणारा असतो पण कोणी काय ग्रहण केलं किती आत्मसात करून पुढील वाटचाल करतो त्यावर सारं अवलंबून असतं असंच म्हणावं लागेल. हे झालं एक गुरु चे अनेक विध्यार्थी पण विध्यार्थी अनेक पण गुरु एक असुन ज्ञान ग्रहण करण्या वरून त्यांची वागण्याची राहण्याची विचारसरणी पद्धत बदलली. हे झालं गुरु शिक्षण बद्धल पण उलट द्रोणाचार्य महान गुरु सुद्धा लबाड लबाडी करतं नं शिकवता गुरु दक्षिणा मागणारा दुर्त गुरु असंच मी म्हणेल. शिक्षण नं देता अंगठा कापून शिक्षा देणारा गुरु महान कसा ठरू शकतो हे सुद्धा गुरु परंपरा मध्ये माझ्या आकलन पलीकडे आहे असो. गुरु पौर्णिमा हि गुरु बद्धल आदर प्रेम व्यक्त करतं गुरुचे पूजन करण्याची पूर्वापार चालतं आलेली प्रथा. महर्षी व्यास मुनी आध्यगुरू म्हणून हिंदू धर्मात मान्यता देत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतं त्यांचं ऋण फेडावं म्हणून त्यांचं पूजन करतात. भारतीय संस्कृती शिल्पकार मुलाधार मानलं जाते.त्यांनी रामायण, महाभारत असे धर्म ग्रन्थ अंनत लिहलेत . ज्यात न्याय, नीती, व्यवहार, मानसशास्र, धर्मशास्र, भारतीय संस्कृती मध्ये अमूल्य अशीच ग्रन्थ संम्पदा दिली म्हणून हा कृतज्ञता दिवस गुरुपौर्णिमेचा महान असा दिवस. आद्य देव भ्रम्हा, विष्णु, महेश यांच्या बद्धल संपुर्ण माहिती ग्रन्थ रूपात मांडली म्हणून देवांच्या पेक्षा देवांची माहिती जगाला सांगणारा शिक्षक हा महान होय. त्यांनी देव सांगितले नसते तर जनतेला देव समजले नसते म्हणूनचं गुरु पूजन केलं तरी देव पुजन होऊन जातं असं म्हटलं जातं. जसं मातापिता पूजन केलं तरी देव पूजन होऊन जातं अगदी तसंच. आईवडील आणि गुरु पूजलेत तरी देवपूजा होऊन जाते. देवांचे दर्शन त्यांच्या पूजनाने होतं असंच आहे.
" गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर: गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः " हा श्लोक म्हणून म्हटला जातो. भारतीय संस्कृती मध्ये गुरु हे जीवन मूल्य जीव जीवन जगणं शिकवतात म्हणून गुरु हे देवा पेक्षा श्रेष्ठ. जगात लहान ते वृद्ध पण पर्यंत अनेक गुरु भेटतं असतात. गुरु सूर्य,चंद्र,ग्रह तारे तारका यांच्या सारखं तेज ते अंधार चांगलं वाईट सारं सारं ज्ञान शिकवण देत असतात. म्हणून गुरु प्रति आदर व्यक्त करतं चला तर मग गुरपौर्णिमा साजरी करूयात. सर्व जगात सुख समृद्धी नांदुदेत या सभाद्भावना ठेवतं गुरु बद्धल आदर प्रदीप पाटील लहान मनुष्य जीव व्यक्त करतो.आणि
आपणा सर्वांना "गुरपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा" देत गुरु पौर्णिमा पुष्प थोडक्यात संपवतो.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


सुंदर छान 🪔👏🏼
ReplyDelete