कृष्ण जन्म अष्टमी ✍️



 कृष्ण जन्म अष्टमी 


घरी माझ्या देव आला

सण जन्म अष्टमीचा 

साजरा करूया चला 

मित्र आहों आयुष्याचा.


जन्म देवा आज झाला 

हटवण्या काळोखाला 

दृष्ट मारण्या मामाला 

अवतार कृष्ण आला.


मित्रा चा मित्र तो झाला 

दृष्टाचा संहार केला 

सत्याचाची पाठीराखा 

दिलं वस्र झाकण्याला.


युद्ध तंत्र मंत्र यंत्र 

सांगे तोची अर्जुनाला 

गीता ज्ञान हो जगाला 

 गोवर्धन देव केला.


साधलाची परमार्थ 

राहुनी तेची संसारी 

गाई गोऱ्हा घरोघरी 

लोणी गोळा तोची चोरी.


रास लीला राधा सखी 

बाल सवंगळी साथी 

सत्व ज्ञान प्रेम मुखी 

गरीब मित्र सोबती .


प्रदीप पाटील 

गणपूर जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे