देव बुद्धीचा ठेवा मनात भाव. ✍️
देव बुद्धीचा ठेवा मनात भाव.
गणपती सर्व जगात देवात श्रेष्ठ असा.मानव आणि देव उत्पती कारक आध्य देव. अश्या हया देवाची गणेश स्थापना करण्याचा सण जवळ आलाय. तसं तर पूर्वी फक्त अन फक्त घरी घरा घरात गणपती देव देव्हाऱ्यात पूजला जायचा पण अलीकडे ब्रिटिश साम्राज्य मध्ये लोकं एकत्र देवाच्या नावानं यावीत आणि ब्रिटिश विरोधात चळवळ बळकट व्हावी हा एकमेव उद्धेश. देव देवाचा भाव दाखवतं साम्राज्य उलथवण्या साठी केलेला कावा म्हणून गणपती सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळक यांनी क्रांती जोती पेटवण्या साठी केलेली लोकांची जुळवणी साठी सुरु केलेला उत्सव. ब्रिटिशांच्या डोळ्यात फेकलेली धुळ असंच मी म्हणेल. लोकं एकत्र करून जन जागृती साठी सुरु केलेला उत्सव. तसं पाहिलं तर ज्या कारणाने उत्सव सुरु झाला ते उदिष्ट पूर्ण झालं. उदिष्ट पूर्ण होऊन 80 वर्ष झालीत तरी उत्सव तसं तर बंद व्हायला हवा पण देव वर श्रद्धा त्यातून वाढीस लागली म्हणून आज पर्यंत उत्सव वाढला पण बंद किंवा कमी झाला नाही. रस्त्यावर गल्ली बोळात रस्ता अडवून डीजे वाजवून लोकांच्या कडून धाक दडपण दाखवतं वर्गणी गोळा करत. मद्य प्राशन करत आरोळ्या मारत गाणं वाजवत देव पावतं नसतो. उलट आपल्याच माणसांना त्रास होतं असतो. ऍम्ब्युलन्स ला रस्ता बदलवावा लागतो. पेशन्ट वेळेवर हॉस्पिटल पोहचत नाही. डीजे आवाजाने वृद्ध बालक यांना त्रास होतो प्रसंगी मरण येतं.गरोदर महिलांना, रुग्ण यांना कानात हृदयात त्रास होतो.देव झोपलेला कुंभकर्ण नाही म्हणून गणपती देवाला डीजे नकोच. देव राक्षस नाही म्हणून रस्ता आडवणे चूकच वाटतं.
श्रद्धा आहे तर टाळ, मृणा, मृदूंग, वीणा वाजवत भजन कीर्तन देव नामस्मरण करा बघा देव नक्कीच तुमची हाक आयकेल अन मनातील इच्छा पूर्ण करेल. असं मोठ मोठाली वाद्य वाजवत जनतेला त्रास देत देव पावणार नाही. भक्ती
करा भाव ठेवून. दारू,भांग, गांजा, चरस,सारख्या नशा करून नाचून देव पावतं नाही उलट रागावतो असं आध्यात्म सांगतं.
उत्सव उत्सव नाही राहिला हा सोहळा झाला मंडळ स्थापली गेली उत्पन्न जमा होऊ लागलं अमाप पैसा जमा होऊ लागला. देवाच्या नावानं दान, धर्म वाढला पण दान वाढलं दाते वाढले तसं विरुद्ध बाजूला दान हे सत्पात्री लागत नाही असं दिसतं. खूप ठिकाणी आलेल्या दानावर मजा करणारी लोकं दिसता.येणारी पिढी सुधारण्या ऐवजी बिघडली असं दिसतं. गणपती मंडळ काही ठिकाणी धंदेवाईक सारखं वागतं असतात असं बरंच जनतेला दिसतं. पण श्रद्धा भाव म्हणून कोण बोलतं नाही बोललं तर घरात घुसून मारलं तोडलं जातं. हे काय देव सांगतो विचार पटले नाही म्हणून मारा झोडा हि नीती कोणतं पुराण सांगतं. कोणतंच नाही ना मग कश्याला देवाच्या नावानं पापी बनून पापाचा वाटा उचलता. उलट "जन सेवा हिच ईश्वर सेवा" उत्सव करा पण अतिरेक नका करु. मूर्ती जागेवर जरी विसर्जन केली तरी देवाला आनंद होईल. उलट देव म्हणेल वाचलो धांगडधिंगाणा केला नाही माझ्या भक्त मंडळी ने भक्ती मध्ये उत्सव साजरा केला.
मिरवणूक मिरवणुकीत देव आणताना अन नेताना शांती शांत शांतता सनई, चौघडे, टाळ वीणा देव भक्ती मध्ये आनंद आनंदी वातावरण भक्त भक्ती मध्ये तल्लीन वाटतील असं प्रसन्न वातावरण हवं पण तसं दिसतं नाही हि खंत वाटते. असो लोकांनी जागृत होतं कुठं पर्यंत काय करायचं कुठं थांबायचं हे ठरवलं पाहिजे. इष्ट असेल चांगलं ते वाढवा वाईट ते घालवा सर्वांनी पुढाकार घ्यावा. साधं सरळ पूजन अर्चना करत सण घरोघरी साजरा केला तरी देव पावणार हे नक्कीच .
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment