तिजोरी ✍️
तिजोरी
पैस्याची तिजोरी जपूनी हो ठेवा
कोण लुटेल भरोसा कुणावर भावा
भाऊ बहीण रचतात कधी कावा
नुसता करता जगात देखावा
मनात मात्र तिजोरीचा माल सर्व हवा
मुलगा सांगतो बापाला लपवू नका
जमीन जुमला सर्व दागिना हवा
सून सांगते म्हाताऱ्या कडून हिसकवा
आपुलेच होती वैरी दुसरे का सोडती
पैस्या साठी जोडती नाती गोती
वरून सांगती कोण धुवेल थेरड्याची थोती
सूर्य तेजात दिसें सुंदर सारा देखावा
पोटात ओठात निराळा कावा
रात्री अंधारात कळे संग कोणाचा धरावा
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment